वाघोली बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य | पुढारी

वाघोली बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन-तीन दिवसांपासून जोरदार पडलेल्या पावसामुळे पीएमपीच्या वाघोली बस स्टँडमध्ये अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यातून वाट काढून बसमध्ये बसण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. वाघोली बस स्टँड परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून, चिखलातून बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघोली येथे पीएमपीने नव्याने ई-डेपो उभारला आहे. मात्र, डेपोअंतर्गत सुरू असलेल्या वाघोली स्टँडचीच अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. येथील सखल भागात पाणी साचून सर्वत्र चिखल होत आहे. या चिखलातच गाड्या थांबत असल्याने प्रवाशाना बसमधून चढउतारसुद्धा करता येत नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने येथे व्यवस्थितरित्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Back to top button