पुणे : ‘आरटीओ’त जायचंय? मग मारा कांगारू उड्या; कार्यालय परिसरात साचले तळे | पुढारी

पुणे : ‘आरटीओ’त जायचंय? मग मारा कांगारू उड्या; कार्यालय परिसरात साचले तळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आरटीओ कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना शुक्रवारी चांगलीच कसरत करावी लागली. अक्षरश: नागरिकांना कांगारू उड्या मारत कार्यालयात जाऊन कागदपत्रांची कामे करावी लागली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील पार्किंगमध्ये असलेल्या खड्ड्यांमध्ये आणि उथळ भागात पाणी साचले होते. त्यातून वाट काढत नागरिकांना कार्यालयात जावे लागले.

दरम्यान, येथे जप्त करून आणलेल्या व अनेक दिवसांपासून पडून असलेल्या वाहनांमध्येसुध्दा पाणी साचले आहे. यामुळे परिसरात मच्छरांची पैदास वाढून डेंग्यूसारखे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने येथील परिसरात प्रशासनाने स्वच्छता करावी आणि येथे साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Back to top button