पुणे जिल्ह्यात भीमाशंकर, घोडगंगासह शंभर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

पुणे जिल्ह्यात भीमाशंकर, घोडगंगासह शंभर संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेसह सुमारे शंभर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याची माहिती शुक्रवारी रात्री सहकार विभागातून देण्यात आली. राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.
या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी, रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेसह सुमारे शंभर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याची माहिती शुक्रवारी रात्री सहकार विभागातून देण्यात आली.

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.17) मतदान होणार होते; तसेच शिरूर तालुक्यात रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीअर्ज मागे घेण्याचा सोमवार (दि.18) शेवटचा दिवस होता. पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीही 17 जुलै रोजी मतदान होणार होते. या शिवाय अन्य बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया शासनाच्या आदेशामुळे तूर्तास थांबली आहे.

जिल्ह्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या विकास सोसायट्यांच्या बहुतांश निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. सद्यस्थितीत 30 ते 35 विकास सोसायट्या, काही खरेदी-विक्री संघ, तसेच शहर व जिल्ह्यातील काही सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. तसेच काही गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकाही सुरू होत्या. निवडणुका पुढे ढकलण्याच्या शासनाच्या आदेशामुळे त्यांच्या निवडणूक प्रक्रिया आहे त्याच टप्प्यावर थांबणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news