मावळात धुवाधार पाऊस

अतिवृष्टी
अतिवृष्टी

लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळ्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच बुधवारी (दि. 13) सकाळी 7 वाजल्यापासून गुरूवारी (दि. 14) सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत 234 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, त्यानंतर पुढील 10 तासांत म्हणजे बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरम्यान 135 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे एकूण 34 तासांत लोणावळा शहरात 369 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

लोणावळा शहरात बुधवारी दुपारी 2 ते 4 या दोन तासांत तब्बल 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ढगफुटी प्रमाणे पाऊस झाला आहे. यामुळे सायंकाळी 4 वाजेपर्यंत लोणावळा धरणाची जलाशय पातळी 4.84 मीटर झाली असून धरण त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 81 टक्के इतके भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे केवळ 2 तासांत धरण जलाशय साठ्यात 6 टक्क्यांनी वाढ झाली.
पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील 10-12 तासांत सांडव्यावरून अनियंत्रीत स्वरुपाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, अशा सूचना धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. लोणावळा शहरात गुरुवारी सकाळपर्यंत एकूण 1969 मिमी ( 77.52 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत 1348 मिमी (53.07 इंच) पाऊस नोंदविण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news