

बावधन : भुकूम येथे राम नदीलगत झालेल्या अनधिकृत प्लॉटिंगमधील बांधकामांची भिंत राम नदीत कोसळल्याने घरांमध्ये पाणी घुसले आहे. गेल्या पाच वर्षांपासून अनधिकृत प्लॉटिंग आणि त्यानंतर त्यावरती होत असलेले अनधिकृत बांधकामे याकडे पीएमआरडीए जाणून-बुजून डोळेझाक करीत आहे.
नदीची सीमारेषेलगत लोकांनी जागा घेऊन बांधकामे उभी केली. त्यामुळे राम नदीला पूर आल्यानंतर या अनधिकृत बांधकामांमध्ये पाणी शिरले. गेले तीन दिवस या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून त्याचाच परिणाम नदीने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आज दोन तास रेस्क्यू ऑपरेशन करून येतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.