पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा

पिंपरी : गुटखा विक्रीप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने बुधवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास किवळे येथील रामदेव सुपर मार्केटमध्ये ही कारवाई केली. मांगीलाल रामलाल देवासी (37, रा. रामदेव सुपर मार्केट, किवळे), मुकेश चौधरी (रा. काळेवाडी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस कर्मचारी सावन टोपू राठोड (वय 36) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मांगीलाल देवासी हा गुटख्याचा साठा करून असून त्याची विक्री करीत होता. याबाबत युनिट पाचच्या पथकाला माहीती मिळाली. त्यानुसार, त्यांनी छापा मारून कारवाई केली.

यामध्ये पोलिसांनी 56 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच, मांगीलाल देवासी याला अटक केली आहे. मुकेश चौधरी याने हा प्रतिबंधित गुटखा मांगीलाल याला विक्रीसाठी आणून दिला, असे पोलिस चौकशीत समोर आले. त्यामुळे मुकेश चौधरी याच्यावर देखील गुन्हा दाखल कऱण्यात आले आहे.

Back to top button