पुणे महापालिकेचा विमा म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’

पुणे महापालिकेचा विमा म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’
Published on
Updated on

हिरा सरवदे,

पुणे: महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या 'पंडित दीनदयाळ अपघात विमा योजने'साठी महापालिकेने विमा कंपनीला तीन वर्षांत 16 कोटी 54 लाख 39 हजार 103 रुपये प्रिमियम भरला आहे. मात्र, तीन वर्षांत केवळ 102 लाभार्थ्यांना 4 कोटी 44 लाख 86 हजार 924 रुपयेच लाभ मिळाला आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रसारासाठी प्रशासन कमी पडल्याचे समोर आले आहे.

नियमित मिळकतकर भरणार्‍या मिळकतधारकाच्या कुटुंबासाठी महापालिकेकडून 'पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना' राबविली जाते. या योजनेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना 2018-19 च्या अंदाजपत्रकात तरतूद केली होती. मिळकतकराचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रामाणिकपणे नियमित कर भरणार्‍या मिळकतधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना विमा योजनेअंतर्गत पाच लाखांचे अर्थसाह्य मिळेल, असा यामागील उद्देश आहे. या योजनेंतर्गत महापालिकेने करआकारणी झालेल्या मिळकतधारकांचा ग्रुप विमा काढण्यात येत असून, दरवर्षी विमा कंपनीला कोट्यवधी रुपये प्रिमियम भरण्यात येतो.

या योजनेत मिळकत धारकासोबत त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश करण्यात आला. दरम्यान, दरवर्षी जाहिरात काढून विमा कंपनीची नियुक्ती केली जाते. मागील तीन वर्षांत 16 कोटी 54 लाख 39 हजार 103 रुपये प्रिमियम भरला आहे. मात्र, तीन वर्षांत केवळ 102 लाभार्थ्यांना 4 कोटी 44 लाख 86 हजार 924 रुपयेच लाभ मिळाला आहे. दरवर्षीची एकंदरीत परिस्थितीवरून या योजनेबाबत प्रशासनासोबतच राजकीय उदासीनताही दिसून येत आहे.

अपघात विमा योजनेचा प्रिमियम व लाभार्थींची संख्या :
वर्ष             प्रिमियम रक्कम          लाभार्थी          लाभाची रक्कम
2018-19      5,81,63,375             12                 60,00,000
2019-20      6,10,29,928             47                2,04,79,000
2020-21     4,62,45,800              43                1,80,07,924
एकूण         16,54,39,103            102                4,44,86,924

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news