देहूरोड : महामार्गावर अपघातात स्कूटीवरील दोघे ठार

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गावर गुरुवारी सकाळी भरधाव आलेल्या कारने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये स्कूटीवरील दोघांचा मृत्यू झाला. शंकर सखाराम शिंदे (वय 80) आणि नरसिंहा गुंडाराव (वय 83, दोघे रा. बालिकाग्राम आश्रमजवळ, थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शिंदे व गुंडाराव हे स्कुटीवरुन (एमएच 14 बीएम 3504) वीज बिल भरण्यासाठी निगडी येथे चालले होते. या वेळी पुणे-मुंबई महामार्गावरील सीक्यूएसव्ही गेटसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना निगडीतील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.