प्रेमसंबंधातून अत्याचार; 34 लाखांची फसवणूक | पुढारी

प्रेमसंबंधातून अत्याचार; 34 लाखांची फसवणूक

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात खेचल्यानंतर कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन शरीर संबंधाचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हायरल करण्याच्या धमकीने तरुणीचे फ्लॅट विक्रीतून आलेले पैसे, बचत आणि पगार घेऊन 33 लाख 93 हजार 721 रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी पुलगेट परिसरात राहणार्‍या एका 33 वर्षांच्या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी सोहेल अजीम सय्यद (वय 32, रा. कोंढवा खुर्द) व त्याच्या 4 नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2017 ते 2019 दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांची सोहेल याच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. फिर्यादी या सोहेल याच्या घरी गेल्यावर त्याने कोल्ड्रींक्समधून कसले तरी गुंगीचे औषध दिले.

बेशुद्ध झाल्यावर त्याने त्यांच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादीवर वेळोवेळी शरीर संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांचा फ्लॅट विक्री करून ते पैसे, बचतीचे तसेच पगाराचे पैसे असे एकूण 33 लाख 92 हजार 721 रुपये त्यांच्याकडून वेळोवेळी घेऊन फसवणूक केली.

Back to top button