क्रीडांगण विकास योजनेला आता 31 ऑगस्टची मुदत | पुढारी

क्रीडांगण विकास योजनेला आता 31 ऑगस्टची मुदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व पात्र विभागांनी व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत,’ असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत राबवण्यात येत असलेल्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेची अनुदान मर्यादा कमाल 7 लाख इतकी करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, शासकीय विभाग, आदिवासी व समाजकल्याण विभागातंर्गत शासकीय आश्रमशाळा व स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका यांना खुली व्यायामशाळा साहित्य व व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी 7 लाख रुपयांच्या मर्यादेत व्यायामसाहित्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ज्या गावांत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा उपलब्ध असेल तेथे व्यायामसाहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दलित वस्ती किंवा वस्तीच्या नजीकच्या परिसरात सुयोग्य मोकळी जागा उपलब्ध असेल तर खुले व्यायामशाळा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडांगण विकास अनुदान योजनेंतर्गत 3 लाख रुपयांच्या मर्यादेत विविध खेळांचे क्रीडा साहित्यही दिले जाणार आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत येरवडा येथील डीएसओ कार्यालयात प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन कसगावडे यांनी केले.

आदिवासी भागातही मिळणार साहित्य…
आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायती व आदिवासी शाळा तसेच आदिवासी क्षेत्रालगत ग्रामपंचायती व शाळांना व्यायामसाहित्य व खुली व्यायामशाळा साहित्य व क्रीडासाहित्य पुरवठा करण्याची योजना

Back to top button