पुणे शहराने सरासरी गाठली; हंगामात 314 मिमी पाऊस
पुणे : शहरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराने जुलैची सरासरी पार केली असून, त्या पेक्षा 78 टक्के अधिक पाऊस झाला आहे. गुरुवारीदेखील दुपारी सलग आठव्या दिवशी शहराला संततधार पावसाने झोडपले. चोवीस तासांत शहरात 70 मिमी पावसाची नोंद झाली. शहराची जुलै महिन्याची सरासरी 220 मिमी आहे.
मात्र, 14 जुलैपर्यंत शहरात 314 मिमी पाऊस झाला. त्यामुळे गुरुवारी पावसाची उणे 28 मिमीची तूट भरून काढत तब्बल 78 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. शहरात गेल्या चोवीस तासांत 54 मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी संततधार पावसामुळे शहरात पुन्हा दाणादाण झाली. रात्री उशिरापर्यंत 21 मिमी पाऊस झाल्याने दोन दिवसांत 70 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.