सोशल मीडियावर मुलीची बदनामी | पुढारी

सोशल मीडियावर मुलीची बदनामी

पिंपरी : सोशल मीडियावर पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो आणि अश्लील मजकूर पोस्ट करून बदनामी केली. ही घटना 9 जून ते 12 जुलै 2022 या कालावधीत घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मंगळवारी (दि. 12) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक केले. आयडी आणि पासवर्ड बदलून त्यावर नवीन खाते अ‍ॅड केले. त्यानंतर मुलीचा फोटो आणि मोबाईल नंबर अश्लील मजकुरासह पोस्ट केला. तसेच, फिर्यादी यांनाही पोस्ट फॉरवर्ड केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button