मुठा नदीच्या पुराचे पाण्यामुळे मांजरी पूल बंद | पुढारी

मुठा नदीच्या पुराचे पाण्यामुळे मांजरी पूल बंद

मांजरी : मुठा नदीच्या पुराचे पाणी मंगळवारी रात्री पुलावरून जाऊ लागल्यानंतर या पुलावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. मांजरी बुद्रुक आणि मांजरी खुर्द या दोन्ही गावांना जोडणार्‍या या पुलावरून पाणी जात आहे.

अशा स्थितीत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज धोकादायक पुलावरून सर्रास वाहतूक सुरू होती. मांजरी खुर्दचे ग्रामस्थ अशोकमामा आव्हाळे यांनी पोलिसांशी संपर्क केला. प्रशासनाने तातडीने पूल बंद करण्यात आल्याचे सांगितले.

Back to top button