डॉ. परितोष गंगवाल यांना जामीन मंजूर | पुढारी

डॉ. परितोष गंगवाल यांना जामीन मंजूर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मालमत्तेवरील मालकीवरून सुरू असलेल्या वादात मृत्युपत्रास जोडलेले वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याबद्दल सहआरोपी करण्यात आलेल्या डॉ. परितोष गंगवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या प्रकरणी कोणताही सहभाग नसताना केवळ मृत्युपूर्वी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले म्हणून तक्रारदाराने सहआरोपी केले, असे डॉ. परितोष गंगवाल यांचे वकील अ‍ॅड. चिन्मय भोसले यांनी सांगितले.

सत्यजित बडे व अ‍ॅड. परीक्षित बडे या भावंडांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू आहे. त्यांचे वडील देविदास शंकर बडे यांच्या मृत्युपत्रांवरून सत्यजित बडे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत अ‍ॅड. परीक्षित बडे यांच्यासह अन्य पाच लोकांची नावे घालण्यात आली आहेत. पुण्यातील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यानंतर डॉ. परितोष गंगवाल यांनी अ‍ॅड. चिन्मय एस. भोसले यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश मानेशिंदे, अ‍ॅड. धनश्री वाडपल्लीवार-पवार यांनी काम पाहिले.

Back to top button