हिंजवडीतील रस्त्यांवर पाणी | पुढारी

हिंजवडीतील रस्त्यांवर पाणी

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर बुधवारीदेखील कायम होता. पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने आयटीनगरीच्या मुख्य रस्त्यावर नदी अवतरली होती. जागतिक दर्जाच्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील मुख्य रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती उद्भवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

त्यामुळे बराच काळ वाहतूक ठप्प होऊन हजारो कर्मचारी अडकून पडले होते. रस्त्यांवरील हा जल प्रलय पाहून आयटीयन्स व स्थानिक नागरिकांच्या सरकारबद्दल संतप्त भावना व्यक्त होत होत्या. अनेकजण म्हणत होते, काय पाणी… काय गटार…काय रस्ते.. सगळं कसं… इंटरनॅशनल लेवलचंच..

मंगळवारी तसेच बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी तुंबल्यामुळे फेज तीनकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साचले होते.

Back to top button