दापोडी : हॅरिस पुलाखाली अडकली जलपर्णी | पुढारी

दापोडी : हॅरिस पुलाखाली अडकली जलपर्णी

दापोडी : दापोडी येथील गुलाबनगर शेवटच्या भागात नदीचा पात्रात जलपर्णी अडकल्यामुळे जाणारे पाणी अडकलेल्या जलपर्णीमुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ड्रेनिजचे पाणी नदी पात्रात न जाता लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलेले आहे. गेल्या दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फुगेवाडी येथील स्मशानभूमीत सगळीकडे पाणी झाले आहे.

तर नवी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट पाण्याखाली गेला आहे. मात्र पवना नदी दुथडी भरून वाहत असताना महापालिकेने येथील परिसरात धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक लावलेला दिसून आला नाही. महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

नदीकाठी राहणार्‍या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नदीपात्रालागत अनेक झोपड्या, बैठी घरे, इमारती, सोसायट्या वसल्या आहेत. अशा लोकवस्तीमध्ये पाणी लवकर शिरते. त्यातच बांधकाम व्यवसायिकांनी नदीकाठी भराव टाकल्याने पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह लोकवस्तीमध्ये त्वरित शिरकाव करीत असतो.

Back to top button