पिंपरी : दहा दिवसांत पवना धरण निम्मे भरले

पिंपरी : दहा दिवसांत पवना धरण निम्मे भरले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्याची तहान भागविणारे 10 टीएमसी क्षमतेचे पवना धरण केवळ 10 दिवसांत 50 टक्के भरले आहे. हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला तब्बल सहा महिने पुरेल इतका आहे. संततधार कायम असल्याने येत्या 15 दिवसांत 100 टक्के धरण भरण्याची शक्यता आहे.

गेल्या तेरा दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे व नाले भरून वाहत आहेत. धरणात चार जुलैला केवळ 16.26 टक्के पाणी साठा होता. त्या दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तेव्हापासून पाणी साठा हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. ती अद्याप कायम आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत 1 हजार 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दहा दिवसांत धरणात साठा वाढून आज रात्री आठला साठा 50 टक्क्यांवर गेला. धरण निम्मे भरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news