पिंपरी : दारू विक्री करणार्‍या तडीपार गुंडाला अटक | पुढारी

पिंपरी : दारू विक्री करणार्‍या तडीपार गुंडाला अटक

पिंपरी : तडीपार असूनही शहरात दारू विक्री करणार्‍या गुंडाला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी (दि. 12) दुपारी पाचच्या सुमारास चर्‍होली खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली. संभा नागर रजपूत (52, रा. चर्‍होली खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या पत्नी विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी रजपूत याला 29 मार्च 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. दरम्यान, त्याच्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहराच्या हद्दीत आला. त्याने आरोपी पत्नीच्या मदतीने हातभट्टी दारूची विक्री सुरू केली. गुन्हे शाखा युनिटने कारवाई करून संभा राजपूत याला अटक केली. दरम्यान, त्याच्या आरोपी पत्नीने पळ काढला.

Back to top button