तस्कर सूरज बोराकडून 23 किलो गांजा जप्त | पुढारी

तस्कर सूरज बोराकडून 23 किलो गांजा जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गांजाची तस्करी करणार्‍या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणीकंद परिसरातून अटक केली. त्याच्याकडून 4 लाख 73 हजार रुपयांचा 23 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सूरज कांतीलाल बोरा (वय 23, रा. केसनंद फाटा, वाघोली) असे त्याचे नाव आहे. बोराविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेगळे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, कर्मचारी नितीन जगदाळे, युवराज कांबळे, साहिल शेख लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला लोणीकंद येथे एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून केसनंद फाट्याकडे जाणार्‍या रोडवर त्यांनी बोराला पकडले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता 23 किलो गांजा आढळला.

Back to top button