पिंपरी : दुचाकीवर छत्री वापरताय, सावध राहा…

पिंपरी : दुचाकीवर छत्री वापरताय, सावध राहा…

पिंपरी : पावसापासून बचावासाठी जर आपण छत्री उघडून दुचाकी चालवत आहात अथवा मागच्या सीटवर छत्री उघडून बसला आहात तर मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कलम 184 प्रमाणे पुनरावृत्ती केल्यास आपणांस सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. त्याऐवजी आपण रेनकोटचा वापर करणे फायद्याचे ठरेल.

शहरात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. घराबाहेर पडताना बरेच नागरिक रेनकोटऐवजी छत्री घेऊन प्रवास करतात. किंवा पावसाची उघडीप दिसल्यानंतर रेनकोटचे ओझे नको म्हणून सोबत छत्री घेऊन बाहेर पडतात. अचानक पाऊस आला की, लगेच मागच्या सीटवर बसलेली व्यक्ति छत्री उघडून चालक आणि स्वतःचा पावसापासून बचाव करतात. काही महाशय तर एका हाताने छत्री आणि दुसर्‍या हाताने वाहनाचा बॅलन्स करतात.

यामुळे स्वतःचा तोल जाऊन अपघात घडतोच, मात्र दुसर्‍या वाहन चालकाच्या समोर छत्री उडाल्याने त्याचा देखील अपघात घडू शकतो किंवा छत्री उघडून बसल्याने पाठीमागच्या अथवा शेजारच्या वाहन चालकांना समोरील वाहतुकीचा अंदाज येत नाही. परिणामी त्यांचाही अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. या पद्धतीने जनतेला धोकादायक ठरणार अशा रीतीने वाहन चालविल्यास या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणार्‍यास सहा महिन्यांचा तुरुंगवास अथवा दंड होऊ शकतो. त्याऐवजी नागरिकांनी पावसाळ्यात घराबाहेर पडताना रेनकोट सोबतच ठेवणेच फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news