पुणे : गॅस दरवाढीविरोधात आंदोलन | पुढारी

पुणे : गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

पुणे :  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात तसेच शिंदे – फडणवीस सरकारच्या वीज दरवाढीच्या विरोधात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. दीपबंगला चौक, शिवाजीनगर येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

माजी नगरसेवक दत्ता बहिरट म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवले. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना घरगुती गॅसचे पन्नास रुपये वाढवून आपल्या जाहिरातीचा पैसा सर्वसामान्यांकडून वसूल करण्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमधील आमदारांचा सुरत, गुवाहाटी व गोव्याचा खर्च वसूल करण्यासाठी वीज दरवाढ करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून केवळ जाहिरातबाजी, सरकार पाडण्यात व टिकविण्यात मशगुल असून गॅस दरवाढ व वीज दरवाढ याच्याशी त्यांना काहीही देणे घेणे नाही.

Back to top button