पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच, परिसरातील रस्त्यावर पाणी जमा झाले आहे. पिंपरी परिसरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी जमा झाल्याचे दिसत आहे. अनेक सोसायट्यामध्ये तसचे रस्त्यावर पाणी साठल्यामुळे नागरिकांना ये-जा करणेही अवघड होवून बसले आहे.
मुसळधार पावसाने पिंपरी शहरातून वाहत असलेल्या पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच, पावसामुळे परिसरातील छोटे-मोठे नाले भरुन वाहू लागले आहेत. पिंपरी कॅम्प, नेहरुनगर, अजमेरा, मोरवाडी, पिंपरीगाव खराळवाडी, वल्लभनगर, संत तुकारामनगर, यशवंतनगर या परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले.
अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. वाहनचालक कृष्णा सिरसाठ यांनी सांगितले, की एकीकडे रस्त्यावर पाणी साचल्याने व खड्डे पडल्याने वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. वाहन सुरक्षितरित्या चालवणे हे चालका समोर मोठे आव्हान बनले आहे.