देहू: किवळे चौकात वाहतूक धीम्या गतीने | पुढारी

देहू: किवळे चौकात वाहतूक धीम्या गतीने

देहूरोड : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. विशेषतः किवळे चौकातून मुंबईकडे जाणारी वाहतूक अतिशय धिम्मी झाली होती. जोरदार पावरसामुळे अनेक रस्ते व विशेषतः पुलाखाली पाणी साठले आहे. शितळानगरजवळील पुलाखाली प्रचंड पाणी साठले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना व कारचालकांना त्यातून वाहन नेताना त्रास सहन करावा लागला. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचार्‍यांनी हे पाणी काढले.

किवळे चौकात पुलाखाली पाणी साचले होते. त्यामुळे येथून मुंबई किंवा देहूरोडच्या दिशेने जाणारी वाहतूक प्रभावित झाली होती. वाहने संथ गतीने जात होती. याचा किवळे गावातील दुचाकीस्वारांना मनस्ताप सहन करावा लागला. येथून जवळच असलेल्या पुलाखालीदेखील पाणीच पाणी झाले होते. किवळे-देहूरोड दरम्यान पुलाच्याजवळ महामार्गावर पाण्याचे तळे साचले होते.

Back to top button