तळेगाव दाभाडे : पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी | पुढारी

तळेगाव दाभाडे : पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी

तळेगाव दाभाडे : गेले काही दिवस मावळ तालुक्यात दमदार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर, नद्यांना पूर येऊन त्या दुथडी भरून वाहत आहेत. संपूर्ण जून महिना मान्सूनच्या पावसाने चांगलाच ताण दिला होता. मात्र, येत्या आठ दिवसांपासून मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत आहे. मावळच्या पश्चिम पट्ट्यातील सह्याद्रीच्या डोंगरी रंगाच्या भागात संततधार व दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवना, वडिवळे, वलवण, आंद्रा या सर्व धरणातील साठ्यात वेगाने वाढ होत आहे. तर कासरसाई, पुसाणे, आढले, मळवंडी ठुले या लघु पाटबंधारे धरणातील साठाही वाढला आहे.

पश्चिम पट्ट्यातील डोंगरी भागात पर्जन्यमान जास्त असल्याने डोंगर उतारावरून धबधब्यातून पावसाचे पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणार्‍यांची वर्दळ वाढू लागली आहे. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळेगाव परिसरात संततधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Back to top button