उदयपूर-म्हैसूर एक्सप्रेस पुन्हा सुरू | पुढारी

उदयपूर-म्हैसूर एक्सप्रेस पुन्हा सुरू

पुणे : रेल्वे प्रशासनाने उदयपूर-म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्सप्रेस पूर्ववत झाली आहे. ही गाडी 11 जुलैपासून दर सोमवारी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी उदयपूर येथून सुटेल. ती दुसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पुण्यात पोहोचणार आहे. तर, मिरज येथे रात्री 11 वाजून 45 पोहोचेल. त्यानंतर ती तिसर्‍या दिवशी सायंकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी म्हैसूर येथे पोहोचणार आहे.

तसेच, 14 जुलैपासून प्रत्येक गुरुवारी म्हैसूर येथून सकाळी 10 वाजता ही गाडी सुटेल. त्यानंतर ती दुसर्‍या दिवशी पहाटे 2 वाजून 35 मिनिटांनी मिरज येथे तर, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. तिसर्‍या दिवशी पहाटे तीन वाजून 35 मिनिटांनी उदयपूर येथे पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Back to top button