पिंपरी : थेरगावातील दाम्पत्याला 37 लाखांचा गंडा | पुढारी

पिंपरी : थेरगावातील दाम्पत्याला 37 लाखांचा गंडा

पिंपरी : भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याला 37 लाखांचा गंडा घातला. ही घटना 1 ऑक्टोबर 2018 ते 14 मार्च 2019 या कालावधीत नखातेनगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी महिलेने रविवारी (दि. 10) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवींद्र त्र्यंबके (31, रा. मुकाई चौक, रावेत), चंद्रमणी लोखंडे (रा. अंबरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि त्यांच्या पतीला भागीदारीत लिफ्ट प्रोजेक्टचा व्यवसाय करू, असे आमिष दाखवले. दरम्यान, त्यांच्याकडून 53 लाख 50 रुपये घेतले. त्यानंतर नफा म्हणून त्यांना सोळा लाख रुपये रोख स्वरूपात माघारी दिले. उर्वरित पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.

संबंधित बातम्या
Back to top button