अमरनाथ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे पार्थिव पुण्यात

अमरनाथ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे पार्थिव पुण्यात

पुणे : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथमध्ये झालेल्या दुर्घटनेत धायरी येथील सुनीता महेश भोसले (वय 52 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, रविवारी रात्री त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. महाराष्ट्र सदनामार्फत पहाटेच्या विमानाने हे पार्थिव सोमवारी पुण्यात
आणण्यात आले.

श्रीनगर जिल्हा प्रशासन व दिल्लीतील जम्मू-काश्मीर भवनकडून रविवारी येथील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून भोसले यांचे पार्थिव दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र सदनाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार्थिव पाठविण्याची व्यवस्था केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news