राज्यात पावसाचे २१ जुलैपर्यंत धुमशान कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज | पुढारी

राज्यात पावसाचे २१ जुलैपर्यंत धुमशान कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सलग पाचव्या दिवशी सोमवारीही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील नद्यांना पूर आला असून, या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अजूनही अतिवृष्टी होत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 21 जुलैपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत गेल्या पाच दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. तर, उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरापासून ते ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. पुढील 48 तासांत
या पट्ट्यांची तीव्र ता आणखी वाढणार आहे. परिणामी राज्यातील पाऊस 21 जुलैपर्यंत कायम राहणार आहे.

गेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस (मि.मी.मध्ये)
कोकण- माथेरान -124, चिपळूण-113, जव्हार- 98, खालापूर- 92, कर्जत- 80, सुधागड, पाली- 67,
मध्य महाराष्ट्र :- र्त्यंबकेश्वर- 182, सुरगणा- 173, इगतपुरी- 132, गगनबावडा- 112, महाबळेश्वर- 106, साक्री- 98, लोणावळा- 96, वेल्हे- 89, नवापूर- 86, राधानगरी- 85, ओझरखेडा- 81, नाशिक – 77, दिंडोरी- 71, तळेगाव- 60, भोर- 55, जुन्नर- 48.
मराठवाडा :- भोकरदन- 46, सिल्लोड- 32, औरंगाबाद- 20
विदर्भ :- सिरोंचा- 171, अहिरी- 127, समुद्रपूर- 82, बल्लारपूर- 82, नागपूर- 77, एटापल्ली- 73, काटोल- 70, चंद्रपूर- 65, चिमुर- 64, गोंदिया- 52.
घाटमाथा :- कोयना- 194, वळवण- 168, लोणावळा- 146, दावडी- 141, ताम्हिणी- 125, डोंगरवाडी, अबोणे- 117, भिवपुरी- 111, वाणगाव- 107, खोपोली- 98, ठाकुरवाडी- 96, भिरा- 70.

पुण्यात रेड अलर्ट
पुणे – (घाट)- 12 ते 14 जुलै
पालघर- 11 ते 14 जुलै
रायगड- 12, 13 जुलै
रत्नागिरी- 12 जुलै
नाशिक (घाट) -12 ते 14 जुलै
कोल्हापूर (घाट)- 12 जुलै
गडचिरोली -12 जुलै

ऑरेंज अलर्ट
पालघर- 15 जुलै
ठाणे -12 ते 15 जुलै
मुंबई- 12 ते 14 जुलै
रायगड- 14, 15 जुलै
रत्नागिरी- 12 ते 15 जुलै
नाशिक – 15 जुलै
कोल्हापूर (घाट)- 13 ते 15 जुलै
सातारा (घाट)- 12 ते 15 जुलै
औरंगाबाद- 12 जुलै
जालना- 12 जुलै
अकोला- 13 जुलै
अमरावती- 13 जुलै
नागपूर- 13 जुलै

राज्यात चोवीस तासांत 14 बळी
राज्यातील अनेक भागांत पावसाने हाहाकार निर्माण केला असून, गेल्या 24 तासांत 14 लोकांचा बळी गेला आहे. राज्यात विविध भागांत 1 जून ते 10 जुलै या 40 दिवसांत 76 बळी गेल्याची नोंद राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. राज्यात कोकण भागात सर्वाधिक नुकसान पुरामुळे झाले असून, सुमारे 4 हजार 115 लोकांचे स्थलांतर करावेलागले आहे. कोकण व विदर्भात मिळून गेल्या चोवीस तासांत 14 लोकांचा बळी गेला आहे, तर राज्यात आतापर्यंत एकूण 76 लोक, तर 125 प्राणी पुरामुळे मृत्युमुखी पडले आहेत, तर 838 घरांचे नुकसान झाले आहे. आगामी 72 तास राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात सर्वांत जास्त 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या

Back to top button