सीमा रक्षणासाठी मानवरहित जिप्सी; जीवितहानी टळणार | पुढारी

सीमा रक्षणासाठी मानवरहित जिप्सी; जीवितहानी टळणार

पुणे ; दिनेश गुप्ता : देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी मानवरहित जिप्सी वाहन तयार करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क’च्या शास्त्रज्ञांनी करून दाखवला आहे. ध्वनिविरहित इलेक्ट्रिक वाहनाचा यशस्वी प्रयोग पाहता, हवाई दलानेही त्या वाहनांची ऑर्डर दिली आहे.

लष्कराला अतिशय दुर्गम भागातून प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी वाहतूक करणे कठीण जाते. जिथे माणसालाच मर्यादा पडतात, अशा भागात मानवरहित जिप्सी वापरून संरक्षणाचे काम केले जाणार आहे. ही नव्या रूपातील जिप्सी अतिशय दणकट तयार केली आहे. त्यातून इंधनासह लष्कराच्या सामग्रीची वाहतूक केली जाणार आहे. या वाहनास एक किट बसवले आहे. त्यानुसार प्लॅन केलेल्या रूटवरच ते वाहन चालेल. गस्तीदरम्यान त्या वाहनावरील कॅमेरा जागेवरील संभाव्य धोक्याची सूचना कंट्रोल रूमला देईल.

जंगल सफारीसाठी…

जंगल सफारीसाठी जाणार्‍या पर्यटकांसाठी ध्वनिरहित इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात आले आहे. वाहनाच्या आवाजामुळे जंगलात ध्वनिप्रदूषण होते. शिवाय, आवाजामुळे प्राणी व पक्ष्यांना त्रास होतो, ही बाब लक्षात घेत संस्थेने वाहनाचे पहिले प्रोटोटाईप मॉडेल राजस्थानातील रणथंभोर व्याघ— प्रकल्पात केले. या ठिकाणी सर्वात कठीण भूभाग असल्याने या प्रोटोटाईप मॉडेल वाहनाची चाचणी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ घेण्यात आली. वन विभागाने या इलेक्ट्रॉनिक कन्व्हर्जन किट वाहनास वापरण्याची परवानगी दिली आहे.

Back to top button