पुणे : कचरा वाहतुकीसाठी 257 वाहने भाडेतत्त्वावर
पुणे : पुढारी वृत्तसेवा : घनकचरा संकलन आणि वाहतुकीसाठी एकूण 257 वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, सात वर्षांसाठी 323 कोटींच्या पाच निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी वाहने भाड्याने घेण्यासाठी पाच निविदा मागविल्या होत्या. यामध्ये रिफ्युज कलेक्टर 19, कॉम्पॅक्टर 11, घंटागाडी 20 ही 50 वाहने सात वर्षे भाडेत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढली होती. त्यात स्वयंभू टान्सपोर्ट सर्वांत कमी दराची म्हणजे 64 कोटी 29 लाख 83 हजार 132 रुपयांची निविदा आली. रिफ्युज कलेक्टर 20, कॉम्पॅक्टर 6, घंटागाडी 29 ही 55 वाहने सात वर्षे भाडेत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढली होती.
त्यात अमत एन्टरप्रायझेज ठाणे यांची सर्वांत कमी दराची म्हणजे 64 कोटी 57 लाख 24 हजार 784 रुपयांची निविदा आली. रिफ्युज कलेक्टर 16, कॉम्पॅक्टर 13, घंटागाडी 19 ही 48 वाहने सात वर्षे भाडेत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढली होती. त्यात सुमित फॅसिलिटी लिमिटेड यांची सर्वांत कमी दराची म्हणजे 65 कोटी 62 लाख 31 हजार 259 रुपयांची निविदा आली. रिफ्युज कलेक्टर 19, कॉम्पॅक्टर 10, घंटागाडी 24 ही 53 वाहने सात वर्षे भाडेत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढली होती. त्यात स्वयंभू ट्रान्सपोर्ट यांची सर्वांत कमी दराची म्हणजे 64 कोटी 43 लाख 40 हजार 381 रुपयांची निविदा आली.
रिफ्युज कलेक्टर 19, कॉम्पॅक्टर 16, घंटागाडी 16 ही 51 वाहने घेण्यासाठी निविदा काढली होती. त्यात अमत एन्टरप्रायझेज ठाणे यांची सर्वांत कमी दराची म्हणजे 65 कोटी 65 लाख 87 हजार 689 रुपयांची निविदा आली. या पाचही निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली.