पुणे : पोखरी घाटात दरड कोसळली | पुढारी

पुणे : पोखरी घाटात दरड कोसळली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागील आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटात सोमवारी (दि. ११) सकाळी दरड कोसळली. यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी येत एकेरी वाहतुक सुरू केली आहे.

सध्या भीमाशंकर परिसरांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरून आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटक व भाविकांनी वाहने सावकाश चालवावी, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button