लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
पतीला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 3 फेब्रुवारी ते 24 जून या कालावधीत डुडुळगाव आणि मोशी येथे घडली.

याप्रकरणी महिलेनेशुक्रवारी (दि. 8) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश केरनाथ बदे (23, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, इंस्टाग्रामवरील चॅटिंग आणि फिर्यादी यांचे सोबतचे फोटो पतीला दाखवण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Back to top button