वडगाव मावळ : वडगावात सेवा रस्ता पाण्यात, प्रवाशांना येथून ये-जा करणे त्रासदायक | पुढारी

वडगाव मावळ : वडगावात सेवा रस्ता पाण्यात, प्रवाशांना येथून ये-जा करणे त्रासदायक

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  वडगाव येथे पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिक व प्रवाशांना येथून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. या अवस्थेला प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असून 15 जुलैपर्यंत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी दिला आहे.

गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील ओढे, नाले भरून वाहत आहे. पाणी निचरा होण्याची व्यवस्था न केल्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावर कुडे वाडा – टेल्कोकॉलनी रस्त्याजवळ सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ते पाणी महामार्गावर पसरले आहे. त्यामुळे, महामार्गाने जाणार्‍यांना त्रासदायक अवस्थेत प्रवास करावा लागतो. रस्ते विकास महामंडळ व आयआरबी च्या गलथान कारभाराने ही परिस्थिती निर्माण झाल्याबाबत संताप व्यक्त करत भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Back to top button