पिंपरी : गाळ्यासाठी भरलेली रक्कम परत करण्यास टाळाटाळ | पुढारी

पिंपरी : गाळ्यासाठी भरलेली रक्कम परत करण्यास टाळाटाळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी येथील बंटी ग्रुपच्या इमारतीमध्ये दहा वर्षे भाडेतत्त्वावर गाळा घेण्यासाठी अनामत म्हणून 5 लाख 42 हजार 800 रूपयांचा डीडी जमा केला. मात्र, करार रद्द करूनही ती रक्कम परत करण्यास भूमि आणि जिंदगी विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप गाळेधारक मेगा काळभोर यांनी केला आहे.

गाळ्यासाठी काळभोर यांनी 23 मार्चला डीडी स्वरुपात पालिकेकडे रक्कम जमा केली. काही कारणाने करार रद्द करून, रक्कम परत मिळावी म्हणून त्यांनी विनंती केली; मात्र प्रशासन तीन महिन्यांपासून रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे. हा प्रकार प्रथमच घडल्याने नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात येत आहे. त्या कार्यवाहीस वेळ जात असल्याने रक्कम परत देण्यास विलंब होत असल्याचे भूमि आणि जिंदगीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button