पिंपरी : आषाढीनिमित्त बाजारात भुईमूग, रताळ्याची आवक | पुढारी

पिंपरी : आषाढीनिमित्त बाजारात भुईमूग, रताळ्याची आवक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मार्केट व मोशी उपबाजारात भुईमूग आणि रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सकाळपासून शहरात संततधार पाऊस सुरू होता. सायंकाळी मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर ग्राहकांनी बाजारात उपवासाला आवश्यक रताळी आणि भुईमुगाच्या शेंगा खरेदीसाठी गर्दी केल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

मोशी उपबाजारात एरवी दिवसाला तीन ते चार क्विंटल होणारी आवक आषाढीनिमित्त मात्र शनिवारी सत्तर क्विंटल एवढी झाली आहे. बाजारात गावरान आणि सटाणा अशा प्रकारातील रताळी उपलब्ध होती. मात्र चवीला गोड असलेल्या गावरान रताळ्याला अधिक मागणी होती. त्यासोबतच भुईमुगाची आवक देखील अठ्ठावीस क्विंटल एवढी झाली होती. यासोबतच केळी आणि पेरूला देखील मागणी अधिक असल्याची माहिती बाजारातील फळ विक्रेत्यांनी दिली. रताळ्यांची आवक करमाळा, बेळगाव आणि चाकण येथून तर, भुईमुग शेंगाची आवक चाकण, शिरूर, नाराणगाव आणि सासवड येथून झाली.

 

 

Back to top button