वीस हजार विद्यार्थ्यांसाठी लाखो जण वेठीस | पुढारी

वीस हजार विद्यार्थ्यांसाठी लाखो जण वेठीस

पुणे: पुढारी वृत्तसेवा: अकरावीत प्रवेश घेणार्‍या सीबीएसईसह अन्य मंडळाच्या केवळ 20 हजार विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाच्या तब्बल 5 लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश थांबवून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षा घेऊन निकाल वेळेत जाहीर केले; परंतु याचे गांभीर्य शिक्षण विभागालाच दिसत नाही. सीबीएसईसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले नसल्याने प्रवेशाचा भाग दोन भरण्याची संधी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे प्रवेशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे.

यंदा अकरावीसाठी शंभर टक्के अभ्यासक्रम आहे. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास शिकविण्याचे दिवस कमी होतील. त्यासाठी सीबीएसईसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ठेवून इन-हाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे.

                                     – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Back to top button