वाडा येथून आषाढी यात्रेनिमित्त वारकर्‍यांसाठी एसटी | पुढारी

वाडा येथून आषाढी यात्रेनिमित्त वारकर्‍यांसाठी एसटी

वाडा : पुढारी वृत्तसेवा वाडा येथून आषाढी एकादशीनिमित्त वाडा ते पंढरपूर यात्रा स्पेशल एसटी बस वारकर्‍यांसाठी सोडण्यात आली. बसचे वाडा ग्रामस्थांच्या वतीने पूजन करण्यात आले. वारकर्‍यांसाठी वाडा येथील जय जय धनुर्धर सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने पंढरपूर वारीचे सालाबादप्रमाणे नियोजन करण्यात आले.

या वारीसाठी परिसरातील तरुणांसह ज्येष्ठ वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली होती. मागील 2 वर्षांनंतर विठ्ठलभेटीची आस लागल्याने अनेकांची मने पल्लवित झाली होती. वाडा येथे एसटी बसचे उपसरपंच किरण हुंडारे यांच्या हस्ते पूजन करून पुढील प्रवासासाठी वारकर्‍यांना शुभेच्या देण्यात आल्या.

वारीसाठी वारकर्‍यांच्या एसटीचे प्रवासभाड्याचे नियोजन शिवाजी मोरे यांनी केले, तर पिण्याच्या पाण्याची सोय गोरक्षनाथ मोरे यांनी केले. या वारीसाठी 50 वारकरी वाडा येथून पंढरपूरसाठी गेले आहेत. टाळ-मृदंगांच्या गजरात हे वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकरिता रवाना झाले. या वारीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने चालक सुग्रीव नाब्दे, वाहक दिलीप काठे यांची नेमणूक करण्यात आली होती.

माजी सरपंच जाकीर तांबोळी, सीताराम बोर्‍हाडे, शांताराम मोरे, शिवाजी हुंडारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पावडे, भाऊ पावडे, पंढरी पावडे, प्रकाश पावडे, सुभाष वाडेकर, गणेश देशमुख, विक्रम तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button