तळेगाव परिसरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ | पुढारी

तळेगाव परिसरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

तळेगाव दाभाडे : शहर परिसरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, शासनाच्या नियमानुसार पथ्य पाळावीत, असे आवाहन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष गुट्टे यांनी केले आहे.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सध्या एकूण 76 रूग्ण आढळून आले आहेत. वैद्यकीय अधिकार्यांच्या मार्फत आजाराची तीव्रता कमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना गृहविलगीकरण कक्षात राहावयास सांगितले जात आहे. तपासणीसाठी आलेल्यामधून रोज साधारणपणे सहा ते सात रूग्ण आढळत आहेत, असे डॉ. उन्मेष गुट्टे व राजेंद्र मोहिते यांनी सागीतले.

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत वराळे, नानोली, आंबी, आंबळे, निगडे, माळवाडी, इंदुरी, नवलाखउंबरे, जांबवडे ही गावे येत असून, या भागातून रूग्ण आढळून आलेले आहेत. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश महालिंगे, डॉ. उन्मेश गुट्टे, डॉ. राजेंद्र मोहिते, डॉ. अनिता राजअध्यक्ष, डॉ. मोनिका भेगडे यांसह अन्य डॉक्टर रुग्णांवर उपचार आणि त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

 

60 वर्षांनंतरच्या ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेऊन 9 महिन्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात बूस्टर डोसची व्यवस्था करण्यात आली आहे.
– डॉ. उन्मेष गुट्टे,
प्रमुख वैद्यकीय अधिकारी

Back to top button