लोणावळ्यात पावसाची मुसळधार बॅटिंग ! | पुढारी

लोणावळ्यात पावसाची मुसळधार बॅटिंग !

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : लोणावळ्यात मुसळधार पाऊस पडत असून, मागील 24 तासांत उच्चांकी 180 मिमी (7.09 इंच) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 7 जुलै सकाळी 7 ते 8 जुलै सकाळी 7 या 24 तासांत हा पाऊस पडला. लोणावळा शहरात चार दिवसांपासून पाऊस कोसळत असून, मागील तीन दिवसांत रोज सरासरी 160 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे.

त्यामुळे शुक्रवार सकाळअखेर लोणावळ्यात पडलेला एकूण पाऊस 907 मिमी (35.71 इंच) इतका नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षी आज अखेर 1132 मिमी (44.57 इंच) इतका पाऊस पडला होता. यावर्षी केवळ मागील तीन दिवसांत 492 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील धरणांची पाणीपातळी वाढू लागली असून, भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

लोणावळा धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. याशिवाय पवना धरण भागातदेखील पावसाने जोर पकडला असल्याने पवना धरणाची पाणीपातळी मागील 24 तासांत 2.73 टक्क्यांनी वाढली असून धरणातील पाणीसाठा 22.18 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

Back to top button