पिंपरी : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा प्रकार एप्रिल 2022 मध्ये केशवनगर, चिंचवड येथे घडला. अजय शंकर फडतरे (19, रा. चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पीडितेच्या आईने चिंचवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीच्या 15 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Back to top button