पिंपळे गुरव : पावसामुळे रस्त्यावरील डांबर गेले वाहून | पुढारी

पिंपळे गुरव : पावसामुळे रस्त्यावरील डांबर गेले वाहून

पिंपळे गुरव : परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे खड्डे पडल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यात जागोजागी पाण्याची डबके तयार झाल्यामुळे पादचार्‍यांनादेखील चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयातून वाहने जात असल्यामुळे पायी चालणार्‍यांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे. पहिल्याच पावसामुळे काही भागातले रस्ते निसरडे झाल्याने वाहनाचे घसरून पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. पिंपळे गुरव भागातील अंतर्गत रस्ता एकसारखा नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे सिंहगड कॉलनी भागातील रस्त्यावर डांबर वाहून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविणार्‍यांच्याविराधोत कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

Back to top button