ग्रामीण भागात अनेक कुटुंबे वळली चुलीकडे; गॅस दरवाढीने स्वयंपाकाचे बजेट कोलमडले

ग्रामीण भागात अनेक कुटुंबे वळली चुलीकडे; गॅस दरवाढीने स्वयंपाकाचे बजेट कोलमडले
Published on
Updated on

मंचर; पुढारी वृत्तसेवा: घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 1057 रुपयांवर गेल्याने ग्रामीण भागासह आदिवासी भागातील गोरगरीब नागरिकांना गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. तसेच सिलिंडर जोडणी असणार्‍यांना केरोसीनही मिळत नाही. परिणामी काही गावातील कुटुंबे आता स्वयंपाकासाठी चुलीकडे वळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण व आदिवासी भागात महिलांना धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री 'उज्ज्वला' गॅस योजना राबविली. अनुसूचित जाती व जमाती आणि दारिद्य रेषेखालील कुटुंबांना 100 रुपयांमध्ये गॅस कनेक्शन जोडणी दिली. सुरुवातीला दर कमी असल्याने गॅस गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता.

मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षापासून म्हणजे कोरोनाकाळापासून महागाई वाढतच चालली आहे. सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. अशातच ग्रामीण भागात घरापर्यंत सिलिंडर आणण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकांनी सरपणाचा वापर सुरू केला आहे. गोरगरीब नागरिकांचा विचार करता घरात मजुरी करणारा एखादाच सदस्य असतो. मग एवढे मोठे कुटुंब कसे चालवायचे, हाच प्रश्न त्याला सतावत आहे. घरात सिलिंडर आहे पण स्वयंपाकासाठी त्याचा वापर आता कधीकधीच केला जातो. पूर्वी कमी पैशात सिलिंडर मिळायचे पण आता भरमसाठ किंमती वाढवून सबसिडीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक चालली आहे. त्यात आता सबसिडी मिळणे बंद झाली आहे .त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे अवघड झाले आहे. गुरुवार दि .7 जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडर
1057 रुपये झाला. यामुळे ग्रामीण भागातील बर्‍याच कुटुंबांनी सिलिंडरचा वापर थांबवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमतीमुळे आमच्यासारख्या आदिवासी गोरगरीब जनतेचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. कुटुंबाच्या इतर जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी परिसरातून लाकूडफाटा गोळा करून चुलीवरच स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

                                                 – उषा कुर्‍हाडे, आदिवासी महिला

गेल्या पाच महिन्यांत 154 रुपयांची एका सिलिंडरमागे वाढ झाली. फेब—ुवारी 2022 ते 21 मार्च 2022 पर्यंत 903 रुपये घरगुती गॅस सिलिंडरचे दर होते. 22 मार्च 2022 पासून 953 रुपये दर होता. 7 मे 2022 पासून 1003 दर होता. त्यानंतर 18 मे 2022 पासून 1006.50 पैसे दर होता. 7 जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडर 1057 रुपये दराने विक्री सुरू झाली. गेल्या पाच महिन्यांपासून 154 रुपये एका सिलिंडरमागे ग्राहकांना द्यावे
लागत आहेत.

                                                 – दादाभाऊ थोरात, शेवाळवाडी, मंचर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news