पिंपरी : पावसामुळे कलिंगडांच्या दरात घसरण | पुढारी

पिंपरी : पावसामुळे कलिंगडांच्या दरात घसरण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होताच कलिंगडाच्या दरात घसरण झाली असूनही बाजारात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती शहरातील मोशी व पिंपरी बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दिली आहे. उन्हाची सुरुवात होताच शहरातील बाजारात सर्वात भाव खाणारे व गारेगार असणारे फळ म्हणजे कलिंगड होय.

अतिक्रमणांची तक्रार करा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर

उन्हाळ्यात किरकोळ बाजारात पंचवीस ते तीस रूपये किलो विकले जाणारे कलिंगड आता आठ ते दहा रूपये किलो एवढ्या दराने विकले जात आहे. होलसेल बाजारात तर पाच रूपये दरानेच याची विक्री होत आहे. दर उतरले तरी देखील शहराच्या आजुबाजूच्या खेड, मंचर व शिक्रापुर भागातून मोशी उपबाजारात दहा ते बारा टन कलिंगडाची आवक प्रत्येक दिवशी होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

Back to top button