पुणे : वानवडीत पालिकेचा हातोडा; पाच मजली इमारतींवर कारवाई | पुढारी

पुणे : वानवडीत पालिकेचा हातोडा; पाच मजली इमारतींवर कारवाई

वानवडी, पुढारी वृत्तसेवा: वानवडी गावातील अनधिकृत पाच मजली इमारतीवर पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. इमारतीचा स्लॅब व भिंती पाडण्यात आल्या आहेत. वानवडी गावातील युसूफ शेख यांच्या पाच मजली अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळपासून कारवाई केली. कार्यकारी अभियंता रमेश काकडे, शाखा अभियंता श्रमिक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी महापालिकेच्या वतीने दोन जेसीबी, ब्रेकर, कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button