पिंपरी: पावसामुळे दापोडी, सांगवीकर सुखावले

पिंपरी: पावसामुळे दापोडी, सांगवीकर सुखावले

दापोडी:  सांगवी, दापोडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून रिमझिम पडणार्‍या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाऊस पडल्याने दापोडी, सांगवीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे प्रमुख रस्ते चकाचक झाले आहेत. पाऊस असाच कायम राहिल्यास शहराचे पाणीटंचाईचे संकट टळेल असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

जून महिना संपून पाच दिवस लोटले तरी जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. धरणक्षेत्रातही पुरेसा पाऊस नसल्याने महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणात 16 टक्के पेक्षा कमी पाणी राहिल्याने मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र बुधवारी झालेल्या पावसाने काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मागील दोन-तीन दिवसात कमी पाऊस झाला होता.

रेनकोट, छत्र्यांची विक्री वाढली

पावसाने हजेरी लावल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील रेनकोट, छत्र्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. मात्र नेहमीपेक्षा काहींनी चढे दर लावून रेनकोट, छत्री यांची विक्री दुकानदार करत आहेत. पावसापासून बचावासाठीचे साधन खरेदी करणे आवश्यक असल्याने ग्राहक देखील छत्री, रेनकोट खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news