पिंपळे गुरव परिसरातील पदपथाची कामे रखडली | पुढारी

पिंपळे गुरव परिसरातील पदपथाची कामे रखडली

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : काशीद पार्क परिसरातील पदपथाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काशीद पार्क परिसरात जवळपास सहा हजार नागरिक राहतात. 1

तसेच, अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा छोट्या व्यावसायिक दुकाने असल्याने चालणार्‍यांना रस्ता राहत नाही. काशीद पार्क वाकड-भोसरी बीआरटी रस्त्याच्याकडेला पदपथाचे काम गेल्या कित्येक दिवसंपासून धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, याचा फटका स्थानिकांना बसत आहे. बीआरटी मार्गावरील रस्त्यालगत पदपथाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अर्धवट पदपथावर राडारोडा पडल्याने अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button