रिचार्जच्या बहाण्याने 2 लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांची क्लृप्ती | पुढारी

रिचार्जच्या बहाण्याने 2 लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांची क्लृप्ती

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सायबर चोरटे नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. कधी रिचार्ज करण्याचा बहाणा, तर कधी केवायसी अपडेट करण्याची थाप. नागरिकदेखील अलगद सायबर ठगांच्या जाळ्यात अडकत आहेत.
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या महिलेला सायबर चोरट्यांनी दोन लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पर्वती परिसरातील एका 37 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयटी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 30 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या पतीच्या मोबाईलवर फोन करून केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून क्विक सपोर्ट नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ‘रिचार्ज क्यूब डॉट इन’ या रिचार्ज साइटवर केवायसी अपडेटसाठी 20 रुपयांचे ऑनलाइन रिचार्ज करण्यास सांगितले. फिर्यादींनीदेखील आरोपीच्या जाळ्यात अडकत रिचार्ज केले. त्या वेळी त्यांच्या बँक खात्यातून चोरट्याने 1 लाख 99 हजार 990 रुपये वेळोवेळी दुसर्‍या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. चौकशीनंतर दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

असे जातात बँक खात्यातून पैसे
केवायसी क्विक सपोर्ट, एनी डेस्क ही समांतर काम करणारी अ‍ॅप आहेत. तुम्ही हे अ‍ॅप डाऊनलोड करून सायबर चोरटे सांगतील तशा पद्धतीने प्रक्रिया केली की, तुमच्या मोबाईलचा ताबा त्यांच्याकडे जातो. एकप्रकारे ते तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती पाहत असतात. जेव्हा तुम्ही रिचार्ज करण्यासाठी किंवा एक रुपया पाठविण्याचे काम ऑनलाइन करता, त्या वेळी सायबर चोरटे तुमच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरी करतात. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे काही वे

Back to top button