पिंपरी : उद्यानातील एक हजार डस्टबीनसाठी 38 लाखांचा खर्च | पुढारी

पिंपरी : उद्यानातील एक हजार डस्टबीनसाठी 38 लाखांचा खर्च

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची एकूण 184 सार्वजनिक उद्याने आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी फायबरचे पेंग्विन डस्टबीन बसविण्यात येणार आहेत. असे एकूण 1 हजार डस्टबीनसाठी पालिका 37 लाख 76 हजार रुपये खर्च करणार आहे.

डस्टबीन खरेदीसाठी उद्यान विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडार विभागाने 51 लाख 63 हजार खर्चाची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी बाबा प्ले वर्ल्ड यांची 26.86 टक्के कमी दराची 37 लाख 76 हजार खर्चाची निविदा पात्र ठरली आहे. एका डस्टबीनचा दर 3 हजार 776 रुपये आहे. या खर्चास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

Back to top button