यंदा अकरावीसाठी 87 हजारांवर नोंदणी | पुढारी

यंदा अकरावीसाठी 87 हजारांवर नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन भरता येणार आहे; परंतु प्रवेशाचा भाग एक तब्बल 87 हजार 629 विद्यार्थ्यांनी भरला आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 6 हजार 140 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 87 हजार 629 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

त्यापैकी 61 हजार 635 अर्ज लॉक करण्यात आले आहेत, तसेच 33 हजार 813 अर्ज अ‍ॅटो व्हेरीफाईड करण्यात आले आहेत. 23 हजार 340 अर्जांची पडताळणी केंद्रावर तपासणी पूर्ण झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा 345 महाविद्यालयांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 313 महाविद्यालयांनी आपली माहिती लॉक केली आहे. त्यातील 303 महाविद्यालयांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेशप्रक्रियेसाठी 81 हजार 699 जागा उपलब्ध आहेत, तर व्यवस्थापन, अल्पसंख्याक, संस्थास्तरीय अशा विविध कोटा प्रवेशासाठी 24 हजार 441 जागा उपलब्ध आहेत.

हेही वाचा

बारावीसाठी कॉलेज बदलता येणार; विभागीय शिक्षण उपसंचालकांचा आदेश

कुस्तीगीर परिषदेवर प्रशासक नियुक्‍त

Back to top button