कार्ला : पाटण येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त | पुढारी

कार्ला : पाटण येथील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

कार्ला, पुढारी वृत्तसेवा: पाटण, मळवली भागात अनधिकृतपणे टोलेजंग इमारती बांधत नैसर्गिक ओढे- नाले यांचे प्रवाह अरुंद करणे, प्रवाह बदलणे असे प्रकार करणार्या, बांधकामांवर सोमवारी (दि.4) ‘पीएमआरडीए’ने कारवाई करत सदरची बांधकामे जमीनदोस्त केली. मळवली, पाटण भागातील नैसर्गिक ओढे नाले अडविल्यामुळे मागील वर्षी या भागात पूर झाला होता. मळवली भागातील अभिनव सोसायटीचे हबीडेट येथील शेकडो घरे तसेच परिसरातील बंगले पाण्याखाली गेले होते. मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले होते. तर या सोसायटीतील अनेक नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली होती. या पुरस्थितीला इंद्रायणी नदीपात्राला जोडल्या जाणार्याे नाल्यांवर अनाधिकृत बांधकांमे तसेच तेथील नाल्यांचे प्रवाह बदलामुळे झाल्याचे ‘पीएमआरडीए’च्या निर्देशनास आले होते.

या विषयी स्थानिक नागरिक, एकविरा कृती समिती, शिवसेनेचे शरद हुलावळे,राजेश खांडभोर, विजय तिकोणे आदींनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर आ. सुनील शेळके, तहसीलदार मधुसूधन बर्गे प्रांत संदेश शिर्के,मंडल अधिकारी माणिक साबळे यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करत अनाधिकृत बांधकामे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेला एक वर्ष झाले तरी कारवाई होत नसल्याने एकविरा कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद हुलावळे यांनी देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा घेतला होता. त्यानंतर सोमवारी ‘पीएमआरडीए’ने जेसेबी, पॉकलॅन, ब्रेकर यंत्रांच्या सहाय्याने कारवाई करत बांधकामे जमिनदोस्त केली

Back to top button